विविध सामाजिक विषयांसह आजच्या सध्य परिस्थितीचा लेखाजोखा या विशेषांकाच्या माध्यमातून मांडण्यात आलेला आहे. आजचा युवक ,शेती व दिशाहीन राजकारण हे मुख्य विषय घेऊन यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. धोंडीरामसिंह राजपुत यांचा 'कृतिशील युवकच देशाची खरी संपत्ती',शेती प्रश्नावर जेष्ठ पत्रकार भास्कर खंडागळे यांनी 'खुली अर्थव्यवस्था व शेतीची दुरावस्था' तर शेती अभ्यासक गंगाधर मुटे यांनीशेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही ' या शीर्षकाखाली हा विषय मांडलेला आहे.महिलांच्या समाजातील वास्तवाचे चित्रण 'झुंजलो आम्हीअशा' या लेखातून डॉ.प्रतिभा जाधव-निकम यांनी मांडलेले आहे. आजकालच्यातरुणाईच्या प्रश्नावर तसेच वैवाहिक वैवाहिक जीवनाबद्दल वास्तव मांडणारा चिंतन ' प्रेम नावाचं थडगं ' यातून मनोविश्लेषक प्रा. शीतल मोदी यांनी मांडलेले आहे. ललित साहित्यातील विभागात 'येते कविता आतून' रवींद्र मालुंजकर यांनीतर 'चंद्र होता साक्षीला 'हि दीर्घकथा अभिनेते श्याम सावजी यांनी लिहलेली आहे, गावाकडील राजकारणाचे वास्तव कथेतून मांडताना 'चेहरा हरवलेलं गाव'या कथेतून चित्रपट लेखक भानुदास पानमंद यांनी कथा दिलेली आहे. माणसात देव शोधून 'कर्मग्राम'सारखं वैभव उभं करणाऱ्या डॉ.कविता व डॉ. आशिषसातव यांच्या सामाजिक कार्याचा प्रवास जेष्ठ लेखिका पद्मा कऱ्हाडे यांनी'कर्मग्रामाचे शिल्पकार' यात लिहला आहे. दुष्काळाच्या परिस्थीतीवर मात करायला भाग पाडणारा 'घ्या अंघोळीची गोळी' या सामाजिक अभियानाचा आढावा उपक्रमाचे संयोजक माधव पाटील यांचा आहे. तर वार्षिक राशिभविष्य डॉ.मधुसूदन घाणेकर यांचे आहे . यासह काव्यप्रस्तुतीमध्ये डॉ.पुरुषोत्तम भापकर (मुंबई),ज्ञानेश वाकुडकर(नागपुर),डॉ.विजयालक्ष्मी वानखेडे ( बुलडाणा ) , प्रा.सुदर्शन धस (अहमदनगर ) , रावसाहेब जाधव ( चांदवड ) , प्रवीण वाघमारे ( पुणे ) , प्रमोदपलघडमल ( प्रवरानगर ),पूजा बागुल( नाशिक ),सोमनाथ मांडाळकर (कोपरगाव ) यांच्या कविता , जेष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके ( येवला ) वअरविंद गाडेकर( संगमनेर ) यांची व्यंगचित्रांचा समावेश या अंकात आहे.