Girimitra Awardees, Articles on Mountaineering, Gerlind Kaltenbruner Article. etc
डोंगरभटक्यांचे हक्काचं व्यासपीठ असणारा उपक्रम म्हणजे 'गिरिमित्र संमेलन'. २००१ पासून महाराष्ट्र सेवा संघाने सुरु केलेला हा उपक्रम आज डोंगरभटक्यांमध्ये सर्वात लोकप्रिय असा आहे. कदाचित जगाच्या पाठीवरदेखील अशाप्रकारे एकाच ठिकाणी इतके डोंगरभटके एकत्र येत नसावेत. भारतातीलच नाही तर अनेक विदेशी गिर्यारोहकांनी येथे हजेरी लावली आहे. वेगवेगळी सादरीकरणे, गिर्यारोहणावरील माहितीपट, चित्रपट, परिसंवाद, प्रश्नमंजुषा, छायाचित्र आणि फिल्म स्पर्धा असा भरगच्च कार्यक्रम येथे सादर केला जातो. दरवर्षी जुलैच्या दुस-या आठवड्यात मुलुंड येथे होणा-या या समारंभाची वाट सर्वच डोंगरभटके आतुरतेने पाहत असतात. संमेलनातर्फे दरवर्षी एक स्मरणिका प्रकाशित केली जाते.