विचारी आणि विवेकी, साक्षेपी आणि दक्ष असे तारुण्य हे खरे वैभव असून, तेच अवघ्या आयुष्याला धन्य करणारे आहे. असे वागणारा जागृत व आदर्श तरुणच सर्वोत्तमाचा दास म्हणून जीवनात धन्यता पावतो. ही धन्यता मिळवण्यासाठीची उत्तमोत्तम आणि स्वानुभूत साधने समर्थ श्री रामदासादि जनहितैषी संतांनी आपल्या वाङ्मयात ठायी ठायी सांगितलेली आहेत. अशा अनेक उपायांचा सांगोपांग विचार या ग्रंथात सहजसोप्या संवादात्मक शैलीत केलेला आहे. संतांनी सांगून ठेवलेले हे 'लाभाचे उपाय' प्रयत्नपूर्वक आचरून, आयुष्य सुखी-समाधानी करून जगी धन्यतेचा अनुभव कसा घेता येतो; याचा वस्तुपाठच प्रस्तुत ग्रंथातील अठरा लेखांमधून सविस्तर मांडलेला आहे !