भक्तिमार्गात नामजपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच सहस्रनामासारखी काही स्तोत्रे बहुतेकांची तोंडपाठ असतात. पण नुसती पाठ असून उपयोगाची नाहीत. त्यातील अर्थ किंबहुना गर्भितार्थ जाणून घ्यायला हवा. तोच अर्थ सर्वांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्याची धडपड श्री.धनंजय चितळे प्रवचनांच्या माध्यमातून करीत असतात. त्यांची अभ्यासपूर्ण प्रवचने ऐकणे हा एक छान अनुभव असतो. सहस्रनामावरची त्यांची प्रवचने अनेकांनी ऐकली असतील, त्यांना हे पुस्तक वाचताना पुन:प्रत्ययाचा आनंद मिळेल ; आणि न ऐकलेल्यांना समोर बसून ऐकल्याचा अनुभव येईल अशी खात्री आहे. ‘साधकबोध’ प्रमाणेच हे पुस्तकही वाचकांच्या पसंतीस उतरेल.