"सौभाग्यवती असताना जीवनाचे उतार - चढाव खंबीरपणे, सहजपणे पार करणारी स्त्री, मग ती सुशिक्षित असो किंवा अशिक्षित, निडर, बेफिकीर, स्वच्छंदपणे आपला संसार फुलवत असते पण……… अचानक एके दिवशी पती साथ सोडून गेला तर, तीच कर्तृत्ववान, खंबीर, सबला स्त्री लगेच अबला, दुर्भागी व अस्तित्वहीन होते त्यात समाजाच्या जाचक रुढी परंपरा, भेदक नजरा याने होरपळते. पण स्त्रीने न भरकटता परमेश्वराने दिलेल्या अनमोल जन्माचे सार्थक करण्यासाठी स्वतःची वाट, ध्येय काही देवदूताप्रमाणे सज्जन लोकांची साथ घेऊन स्वतःचे अस्तित्व सिद्ध करावे आणि म्हणावे……… “अस्तित्व माझे ही ”"