संघर्षातून शिखरापर्यंत पोहचणारे विजेते मग ते खेळ, व्यवसाय, उद्योग, मनोरंजन, कॉमर्स, शिक्षण अशा कोणत्याही क्षेत्रातील असले, तरीही सर्वांना पुरस्कार आणि प्रतिष्ठा मिळते. विद्यापीठ किंवा बोर्ड परीक्षेत पहिले येणारे विद्यार्थी प्रिंट मेडियात आणि टिव्हीवर झळकतात. इतकेच नाही, तर आयएएस, आयपीएस, आयएफएस यासारख्या उच्च पदावर, इतर नोकर्यांच्या ठिकाणी तसेच प्रतिष्ठीत संस्थांमधील प्रवेशसुद्धा मिळालेल्या गुणांवरच अवलंबून असतात. साध्या शब्दात सांगायचे, तर सर्वोत्तम गुण, उत्तम ग्रेड आणि उच्च वेतन याच्या आधारेच तुमचे श्रेष्ठत्त्व मोजले जात असते.
पुस्तक दुसर्यांदा वाचले म्हणूनही होणार नाही. जीवन आणि कार्याबद्दलचा आपला दृष्टिकोन तुम्ही बदलणार नाहीत. तुमच्या काम करण्याच्या पद्धतीने तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळत नसतील, ध्येयाकडे जाण्याचा मार्ग मिळत नसेल, तर तुम्हाला स्वत:लाच मार्ग बनवावा लागेल.
पुस्तकात लहान लहान प्रकरणे आहेत, ती २-३ पानांपेक्षा मोठी नाहीत. ५-७ मिनिटांचा वेळ मिळाल्यावरही वाचक हे प्रकरण वाचू शकावे म्हणून असे केले आहे. हे पुस्तक वेगळे आहे कारण तुम्ही ते मध्ये मध्ये वाचू शकता. तुम्हाला शुभेच्छा देऊन तुमचा निरोप घेतो.