प्रेमचंदांनी हिंदी कथांना निश्चित असा दृष्टिकोन आणि कलात्मक आधार दिला. त्यांच्या कथा वातावरण निर्मिती करतात. नायकांची निवड करते. त्यातील संवाद असे असतात की, जणू त्या ठिकाणीच हे सर्व घडत आहे. म्हणूनच वाचक कथेशी एकरूप होतो. यामुळेच प्रेमचंद हे वास्तववादी कथाकर आहेत; पंरतु ते घटनेला जसेच्या तसं लिहिण्याला कथा समजत नाहीत. हेच कारण आहे की, त्यांच्या कथेत आदर्श आणि वास्तव यांचा संगम गंगा-यमुनेसारखा सहज होतो. कथाकार म्हणून प्रेमचंद आपल्या जीवनकाळात दंतकथेस पात्र ठरले होते. त्यांनी मुख्यत: ग्रामीण तसेच नागरी सामाजिक जीवनाला कथेचा विषय केले. त्यांच्या कथेमध्ये श्रमिक विकासाचे लक्षणं स्पष्ट दिसतात. हा विकास वस्तुविचार, अनुभव तसेच शिल्प अशा सर्व स्तरावर अनुभवल्या जाऊ शकतो. त्यांचा मानवतावाद अमूर्त भावात्मक नाही तर सुसंगत यथार्थवाद आहे.