मानवी स्वभावाचे अभ्यासक, मानव प्रशिक्षक, प्रेरक आणि लेखक सूर्या सिन्हा यांचे हे पुस्तक ‘मन जिंकता विजय’ मध्ये अतिशय बारकाव्यानिशी मानवी मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी मनाचे दोन्ही प्रकार- सचेतन मन आणि अचेतन मन याचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे, आपल्या जीवनात क्षणो क्षणी घडणाया घटनांमध्ये किती महत्त्वाची भूमिका बजावतात, याचे सविस्तर वर्णन या पुस्तकात केले आहे. या पुस्तकात माणसाच्या बहुतेक शंका, समस्या, उत्सुकता, जीवनात येणात्र्या परिस्थितीजन्य समस्या आणि अडचणीचे निराकरणही सादर करण्यात आले आहे. आमचा असा विश्वास आहे, की हे पुस्तक आपल्या जीवनात आधीपासूनच असलेल्या तसेच येणात्र्या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लोकांना पुरेपूर मार्गदर्शन करील आणि त्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणेल तसेच त्यांचा जीवन स्तर पहिल्यापेक्षा किती तरी अधिक उच्च आणि उत्तम बनविण्यासाठी मदत करीन.