चार चौघांशी वागणे ही एक अशी कला आहे, जी माणूस असल्यामुळे सर्वांना प्रभावित करते, पण कोणतीही कला तोपर्यंत प्रभावित करू शकत नाही, ज़ो पर्यंत तुम्ही व्यवहार सिद्धांताला वास्तविकतेच्या पातळीवार आणत नाही.
तुम्ही समाजाच्या कोणत्याही थरातील किंवा व्यवसायातील असलात तरीही, जीवनात पुढे जाण्यासाठी आणि सफलता मिळविण्यासाठी इतरांना प्रभावित करणे आवश्यक असते.
ड़ेल कार्नोगी यांचे 'चार चौघांशी वागणे' हे पुस्तक आकर्षक शैली आणि सोप्या भाषेमध्ये वाचकांना सामान्य जनतेशी ज़ोडून घेण्याच्या अचूक पद्धती सांगते. त्यामुळे प्रत्येक वाचकाची ज़ीवन जगण्याची कला विकसित करते.