आज भारतीय समाजात महिलांचे स्वरुप दिवसेंदिवस बदलत आहे. त्या पहिल्यासारख्या गृहिणी म्हणून मर्यादित राहिल्या नाहीत. त्यांच्यात समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा, जोश तसेच आत्मबळाचा संचार झाला आहे. त्यामुळेच तर त्या संसदेपासून अंतराळापर्यंत पोहोचण्यात यशस्वी होत आहेत. महिलांच्या या बदलत्या स्वरुपाचे जीवंत व मूर्तीमंत उदाहरण म्हणजे-किरण बेदी. किरण बेदी भारतातली पहिली महिला पोलिस अधिकारी (आयपीएस) आहे. त्यांनी आपल्या कामाप्रती झुंजारपण, इमानदारी, तसेच कर्तव्यनिष्ठेद्वारे भारतातच नाही तर विदेशातही एक नवा आयाम दिला आहे. त्या आज तरुण पिढीसाठी रोल मॉडेल बनल्या आहेत. पोलिस सेवेतून सेवानिवृत्ती झाल्यानंतरही त्या सामाजिक संस्थांशी जोडलेल्या आहेत. आणि समाजासाठी सकारात्मक कार्य करीत आहेत. त्यांचा समावेश अण्णा हजारे टीमच्या महत्वपूर्ण सदस्यांमध्ये होतो. त्या प्रत्येक सामाजिक आंदोलनात हिरीरीने भाग घेतात. आयुष्याच्या या वळणावरही त्या एक सच्चा कर्मयोगीप्रमाणे आपल्या पथावर अग्रेसर आहेत. सदर पुस्तकात डॉ. किरण बेदी यांच्या प्रमुख कार्याचा आढावा घेण्यात आला आहे. हे पुस्तक आपल्या जीवनाला नवी ऊर्जा आणि प्रेरणा देईल.