आचार्य विष्णुगुप्त (चाणक्य) यांनी रचलेल्या चाणक्य नीतीचा मुख्य विषय मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक बाजूचे व्यवहारिक शिक्षण देणे हा आहे. यात मुख्य रूपाने धर्म, संस्कृती, न्याय, शांती, चांगले शिक्षण आणि सर्वमुखी मानव जीवनाची प्रगती यांची एक झलक प्रस्तुत केली आहे. जीवन सिध्दांत आणि जीवन व्यवहार तथा आदर्श आणि यथार्थाचा एक सुदर समन्वय आचार्य चाणक्य यांच्या या नीती उपदेशवर ग्रंथात पहाण्यास मिळतो. जीवनातील रीती - नीती संबंधी गोष्टींचे जसे अद्भुत आणि व्यावहारिक चित्रण येथे पाहाण्यास मिळते तसे अन्यत्र मिळणे दुर्लभ आहे. त्यामुळेच हा ग्रंथ संपूर्ण विश्वात मान्यता पावलेला आहे.