जागतिक साहित्याच्या इतिहासात महान कथाकार बाबु शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचे नाव अजरामर आहे. त्यांनी त्याचं समग्र साहित्य बंगाली भांषेत लिहीलं, ज्याचे भाषांतर जगातील जवळ–जवळ सर्व भाषेत झालेले आहे. त्यांचे साहित्य इतके लोकप्रिय झाले की त्यांना जागतिक साहित्याचे मानबिंदू समजण्यात आले आहे. शरदचंद्रने आपल्या साहित्यात भारतीय समाजाची परंपरा आणि त्यांचा आदर्श योग्यरितीने स्पष्टपणे चित्रीत केले आहे. शरदचंद्रने आपल्या जीवनात अनेक कादंबच्या व कथांची निर्मिती केली ज्या इतका काळ लोटल्यानंतर आजही अंत्यत लोकप्रिय आहेत. शरदचंद्रच्या प्रत्येक कथा काही ना काही बोध देणाच्या आहेत. ह्या कथा भारतीय नैतीक मूल्यांच्या मापदंडावर खच्या उतरतात. कारण की त्यांच्या ह्या कथांची रचना वेगवेगळया नैतीक मूल्यांच्या आधारावर केलेली आहे. शरदचंद्रद्वारा लिखित समस्त कथांचे मंथन करून ज्या कथांची निवड करण्यात आली आहे त्यांनाच या संग्रहात समाविष्ठ करण्यात आले आहे. केवळ आशाच नाही तर पूर्ण विश्वास आहे की प्रस्तुत संग्रह मराठीच्या सज्ञान वाचकांना निश्चितच आवडेल.