ज्योतीषांनी बरोबरच म्हटलं होतं - “चणी! यासारखा बालक तर शतकानंतर एखाद्या भाग्यवंताच्या घरी जन्माला येतं. सुख त्याच्या पायाशी लोळण घेईल. वैभव त्याच्या पुढे-पुढे नोकराप्रमाणे चालत राहील आणि राजयोगी असूनही त्याला युगपुरूष नव्हे महापंडीतही म्हटल्या जाईल. समाजाला हा एक नवीन व्यवस्था देईल आणि समग्र आर्यावर्तावर त्याची शासनव्यवस्था प्रस्थापित करील. हा बालक केवळ आपल्या बोटांच्या ईशार्यावर परकीयांची सत्ता उलथून टाकील. देशाचा सम्राट कोणाला करायचे हे तो ठरवेल आणि भारताचा गौरव वाढवील!” त्याच `चाणक्य’ नावाच्या बालकाचं नाव जगविख्यात झालं.
ज्याने भारतीय अर्थव्यवस्था, राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक व्यवस्थेला सुनियोजीत ठेवण्यासाठी एका सर्वोत्तम बौद्धिक परंपरेला जन्म दिला. आपल्या कूटनीतिने शत्रुंचा बिमोड केला. आपल्या प्रतिभेने संस्कृत-साहित्याला महत्त्वाचं स्थान दिलं. आपल्या संपूर्ण जीवन पद्धतीला इतरांना शिक्षित करण्यासाठी वाहून घेतलं. ज्याने आयुष्यभर चारित्र्य, स्वाभीमान आणि कर्तव्यनिष्ठेला प्राधान्य दिलं त्याच पुरूषोत्तमाचं नाव `चाणक्य’ आहे.