भगवद्गीता विवेक, बुद्धी आणि प्रतिभेचा संगम असलेला असा ग्रंथ आहे, ज्यामध्ये सर्व वेदांचा समावेश आहे. हे एक असे पुस्तक आहे, जे लाखो लोकांनी वाचले असून कोट्यावधी लोकांनी त्याबद्दल ऐकले आहे. भगवद्गीतेतील प्रत्येक उदाहरण आपल्या जीवनाशी संबंधित आहे; पण मी फक्त आपल्या जीवनाशी संबंधित असलेल्या प्रकरणाचीच निवड केली आहे. आता तर मानसशास्त्र आणि न्यूरोलॉजीने खूप प्रगती केली आहे, तरीही भगवद्गीता, आपले जीवन आणि आपल्या मनोवृत्ती यात नैसर्गिकत: कसा संबंध आहे, हे कळल्यावर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकीत व्हाल.