डॉ.भीमराव रामजी आंबेडकरांना आपण प्रेमाने, आदराने आणि श्रद्धेने ‘बाबासाहेब’ म्हणतो. भीमराव आंबेडकरांनी स्वतंत्र भारताच्या संविधानाचे लेखन केले. एकट्याने संपूर्ण संविधानाचा मसुदा तयार करणे हे कौतुकास्पद काम होते. त्यांनी स्वतंत्र भारताचे संविधान लिहून हे दाखवून दिले की एखाद्याने ठरविले तर कोणतेही काम अशक्य नसते.ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते.
ते खऱ्या अर्थाने देशभक्त होते. त्यांना आपल्या देशाची अखंडता आणि एकता हवी होती. ते समानता, न्याय आणि बंधुभाव यासाठी आयुष्यभर संघर्ष करीत राहिले. स्वतंत्र भारताच्या अखंडतेवर कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही, याची त्यांनी नेहमी खबरदारी घेतली.