स्तोत्र या शब्दाचा अर्थ आहे स्तुती. आपल्या उपास्य देवतेची आळवणी सुमधुर, गेय पद्यरचनेने करून त्याची कृपादृष्टी मिळविण्याचा हा अत्यंत जवळचा व सोपा मार्ग आहे. या पुस्तकामध्ये गणेश, सरस्वती, प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, राधा, जानकी, सुब्रह्मण्यम् (कार्तिकेय), शिवशंकर, श्रीहरी विष्णू, शीतलामाता, परशुराम इत्यादी देवतांची स्तोत्रे भावार्थासह देण्याचा छोटासा प्रयत्न आहे. हा प्रयत्न श्रद्धाळूंना, जिज्ञासूंना, उपासकांना, स्तोत्र अभ्यासकांना उपयोगी पडेल.