मुद्गल पुराण आंतर्गत एकूण नऊ खंड आहेत. गणपतीच्या आठ मुख्य अवतारांविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी या पुराणांमध्ये विस्ताराने लिहिले आहे. यामध्ये ४३८ अध्याय असून याचा विस्तार नऊ खंडात आहे. त्यामधील काही कथा या कीर्तनकारांना उपयुक्त आहेत. त्या किर्तन रूपाने या पुस्तकात लिहिल्या गेल्या आहेत. त्यामुळे कीर्तनकार आणि साहित्याचा अभ्यास करणाऱ्या मंडळींना हे पुस्तक फार उपयुक्त ठरू शकते. या पुस्तकामध्ये नारदीय कीर्तनाला लागणाऱ्या साकी, दिंडी, आर्या, कटाव, झंपा, अंजनीगीत ,ओवी वगैरे साहित्य प्रकारांचा वापर करण्यात आलेला आहे. कीर्तन रूपाने निर्माण झालेले हे पुस्तक म्हणजे गणरायाच्या चरणी अर्पण केलेल्या दूर्वाच आहेत. गणपतीने दिलेल्या बुद्धी आणि कवनशक्ती यांचा वापर करून हा किर्तन उपयुक्त ग्रंथ तयार झाला आहे.