अंबाजोगाईची श्री योगेश्वरी देवी ही महाराष्ट्रातील सर्व देवीभक्तांची उपास्य देवता असून, बहुसंख्य चित्पावन कुटुंबियांची कुलदेवता आहे. चित्पावनांची कुलदेवता श्री योगेश्वरी कोकणापासून इतक्या दूर मराठवाड्यात कशी हा प्रश्न काही तितकासा महत्त्वाचा नाही. बदलत्या परिस्थितीप्रमाणे आता वाहतुकीची उत्तमोत्तम साधने उपलब्ध असताना देवीच्या दर्शनाला जाणे पूर्वीसारखे अवघड राहिलेले नाही. वर्षभरात आपल्या सवडीने आपण देवदर्शनासाठी जातो; यथासांग पूजाउपचार करून समाधानाने आपल्या घरी परततो. बहुतेकजण आपल्या घरी देवीची पूजा-उपासना करतही असतात; पण अशा वेळी देवीची विविध स्तोत्रे, कवच इ. प्रत्येकाचे पाठ असतेच असे नाही. नवरात्रात खूप ठिकाणी कुंकुमार्चन विधि करतात अशावेळी कोणते स्तोत्र म्हणावे असा प्रश्न पडतो. म्हणूनच सर्वांना म्हणता येतील अशी देवीची काही स्तोत्रे, कवच एकत्रित करून त्यांचे एक अत्यंत उपयुक्त असे पुस्तक प्रकाशित करीत आहोत. **‘श्री योगेश्वरीदेवी उपासना’** या पुस्तकात देवीचे सहस्रनामासहीत अष्टोत्तशतमान, कवच, आरती यांचा अंतर्भाव केलेला आहे. नित्य पठणासाठी अत्यंत योग्य आहे.