साधारणतः पर्यटन क्षेत्राबद्दल माहिती पुस्तकात किवां संकेत स्थळावर लिखित स्वरुपात सहज मिळते. परंतु वऱ्हाड वारं काव्यरचना असल्याने वाचक विदर्भातील माहिती वाचून वाचून कंटाळण्या ऐवजी मनोमनी गुणगुणू लागतील व त्यांच्यामनी या स्थळांना भेट देण्याची उत्सुकता देखील निर्माण होईल. आजची व्यस्त जीवन शैली व नवोदित तरुणाईचा ई-छंद लक्षात घेता पुस्तक वाचनाची आवड दिवसें-दिवस कमी होत चालली आहे. तसेच लांबलचक माहिती पुस्तक सरळ-सरळ भाषेत वाचायचं म्हटल की कंटाळवाण वाटून वाचंकाचा वाचनातून रस कमी होतो. नवोदित लेखकांनी नव-नवीन प्रयोग करून वाचक वर्ग कसा वाढवता येईल व आजच्या तरुणाईला वचनामध्ये आवड कशी निर्माण करता येईल याचे उत्तम उदाहरण म्हणजे सौ.राणी मोरे यांचे ‘वर्हाड वारं’ होय.