लाल किताब विशेषत्वाने त्या लोकांसाठी आहे, जे कमीत कमी वेळेत, जास्त पैसे खर्च न करता, कोणत्याही पंडिताकडून सल्ला न घेता, स्वत: वापर करू शकतात. या पुस्तकात लाल किताबाची संपूर्ण माहिती दिली आहे, त्याचबरोबर मंगळ दोष, रोग, ऋण-मुक्ती, संतती सुख, गृह सुख, आयु निर्णय यावर विशेष उपाय दिले आहेत. ग्रह दोष निवारण, ग्रहांपासून होणाऱ्या रोगांसाठी लगेच प्रभावी उपाय दिले आहेत. या पुस्तकाला ‘संपूर्ण लाल किताब’ म्हटले जाऊ शकते. जगप्रसिद्ध ज्योतिषाचार्य, प्रसिद्ध आणि लोकप्रिय भविष्यवेत्ते, सर्वाधिक ज्योतिषविषयक पुस्तकांचे लेखक डॉ. राधाकृष्ण श्रीमाळी यांनी लिहिलेले हे पुस्तक खूप उपयुक्त आहे. जे वाचक सोप्या भाषेत मराठीत लाल किताब शोधीत होते, त्यांच्यासाठी हे पुस्तक शेवटचा टप्पा आहे.