गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावंतस या बिरुदाने आदर आणि अभिमानाने आभूषित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना एक धाडसी, चतुर व नीतिवान हिंदू शासक म्हणून नेहमी लक्षात ठेवल्या जाईल. त्यांच्याकडील साधन-सामग्री अंत्यत मर्यादीत होती तसेच त्यांना काही जास्त शिक्षण पण घेता आले नव्हते, तरी पण त्यांनी आपली बहादुरी, धाडस तसेच हुशारीने औरंगजेबासारख्या शक्तीशाली मुगल सम्राटाच्या विशाल सैन्यासोबत जबरदस्त झुंज दिली आणि आपल्या शक्तीला वाढवलं. छत्रपती शिवाजी महाराज एक कुशल प्रशासक तर होतेच पण एक समाज सुधारक देखील होते. त्यांनी अनेक लोकांचे धर्मपरिवर्तन करून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणले. छत्रपती शिवाजी महाराज अंत्यत चारित्र्यवान व्यक्ति होते. ते स्रियांचा खूप आदर करीत. स्रियांसोबत गैरवर्तन करणार्या आणि निरापराध लोकांना त्रास देणार्यांना ते कठोर शिक्षा देत असत.