आजच्या भौतिकवादी जगात संपत्तीचे महत्त्व नाकारता येत नाही. संपत्ती हे साध्य नसले तरी सर्वांत मोठे साधन आहे. श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सर्व जण संपत्तीचे महत्त्व आणि गरज कबूल करतात. प्रत्येक व्यक्ती विविध मार्गनी संपत्ती मिळविण्यासाठी प्रयत्न करते आणि आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्यांचा संचयही करते. संपत्ती संचय करण्याचे बँक हे महत्त्वाचे साधन असून तिथे आपली संपत्ती सुरक्षित आणि योग्य प्रकारे राहते. अर्थात आपल्याला ज्या वेगात संपत्तीची वाढ हवी असते त्यावेगाने बँकेत संपत्तीची वाढ होत नाही. अशा परिस्थितीत विवेकाने आणि थोडी जागरूकता दाखवून आपली संपत्ती योग्य विस्तृत क्षेत्राकडे वळवली तर आपल्या गरजेनुसार तिच्यात वाढ होऊ शकते आणि त्यासाठी सुरक्षित क्षेत्र आहे शेअर बाजार.
शेअर बाजार ही खजिन्याची किल्ली असलीतरी त्याला पूर्णपणे समजून घेण्यासाठी हे पुस्तक काळजीपूर्वक वाचा.