‘संपूर्ण वास्तुशास्त्र’ हे वास्तुकला घेऊन लिहिलेले पहिले पुस्तक आहे, ज्यामध्ये भवन स्थापत्य कलेविषयी सविस्तर चिंतन करण्यात आले आहे. नवीन घराचे प्रवेशद्वार कोणीकडे असावे? द्वारवेध कशाला म्हणतात, ते किती प्रकारचे असतात. घरात पाणी साठा कुठे असावा? कीचनमध्ये अग्निस्थान कुठे असायला हवे? बेड रूम कोणत्या दिशेला असावी म्हणजे तिथे झोपणार्याला भरपूर झोप मिळेल? राहण्यासाठी योग्य अशा भूखंडाचा आकार कसा असायला हवा? जमीन परीक्षणाचे शास्त्रीय विधी काय काय आहेत? योग्य वास्तुचे मुहुर्त कसे बघायला हवेत? अशा सर्व पैलूंवर अंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळविलेले विद्वान लेखक डॉ. भोजराज द्विवेदी यांनी व्यवहार्य चित्रांसह या पुस्तकाला अतिशय सुंदर रितीने सजवून जास्त उपयुक्त केले आहे.