नमो: मंत्र म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या सफलतेचे रहस्य. नरेंद्र मोदी हे असे एक लोकप्रिय नाव आहे, जे परिस्थितीला अनुसरून आपल्यात बदल करून घेत नाही, तर परिस्थितील आपल्या अनुकूल बनविते. वाकड्या तिकड्या मार्गावरून वाटचाल करीतही आपले ध्येय गाठणे त्यांना माहीत आहे. त्यांचे अनुभव हाच त्यांचा मंत्र असून त्याचा जप करून प्रत्येक राजकीय नेता नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे लोकप्रियता मिळवू इच्छित आहे. लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवून पंतप्रधानपदी आरूढ होणाच्या नरेंद्र मोदीमुळे देशात मोदीयुगाची सुरूवात झाली आहे. मग प्रश्न शासन व्यवस्थेचा असो, की औद्योगिक विकासाचा, रोजगार स्वावलंबनाचा असो की शिक्षणाचा असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ बनविण्याच्या दिशेने पाऊले टाकायला सुरूवात केली आहे. शासकीय कामकाजापासून कौटुंबिकवाद दूर ठेवण्याचा विषय असो, की मंत्र्यांसाठी १०० दिवसांचे वेळापत्रक तयार करण्याचा कार्यक्रम असो, या सर्व गोष्टी नरेंद्र मोदी एक कुशल प्रशासक असल्याचे सिद्ध करणाच्या आहेत. धर्मनिरपेक्षतेचा विचार केला, तर मोदींच्या सदभावना यात्रेच्या काळात मिळालेला मुस्लिम आणि खिश्चनांचा प्रतिसाद त्यांची स्वच्छ प्रतिमा मांडणारा आहे. हे पुस्तक त्यांच्या अशाच वेगळ्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे...