गोदान प्रेमचंदांची सर्वाेत्तम कृती आहे, ज्यात त्यांनी ग्रामीण आणि शहरी अशा दोन कथांचे बेमालूम मिश्रण केले आहे. या पाश्र्वभूमीवर गोदान होरीची कथा आहे, त्या होरीची जो जीवनभर मेहनत करतो, अनेक दु:ख सहन करतो, केवळ यामुळे की इज्जतीचे रक्षण व्हावे आणि म्हणून तो इतरांना प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न देखील करतो, परंतु त्याला त्याचे फळ मिळत नाही आणि शेवटी विवश व्हावे लागते. तरीपण स्वत:ची इज्जत नाही वाचवू शकत.परिणामी तो हळूहळू आपल्या देहाचा होम करतो, ही केवळ एकट्या होरीचीच कथा नाही, त्या काळातील प्रत्येक भारतीय शेतकयांची आत्मकथा आहे आणि यासोबत जोडलेली आहे शहराची प्रासंगीक कथा. दोन्ही कथांचे मिश्रण इतक्या अफलातून केले आहे की त्यात वेगळेपणा कुठेच जाणवत नाही. प्रेमचंदाच्या लेखणीचे हेच वैशिष्ट्ये आहे.