आपण आपल्या घरी जे फळ भाज्या आणि मसाला खातो त्याचे गुण आणि उपयोग जर आपणास माहित झाले तर ते आपल्यासाठी डॉक्टरसारखे काम करु शकतात. आपण जे काही खातो त्याला अशा पध्दतीने खा की ते आपल्यासाठी उपयोगी सिद्ध होतील. आजीबाईचा बटवा किंवा घरगुती इलाज हे सर्व या गोष्टीपासुनच होतो आणि हाच घरचा वैद्य ठरतो. आंबा, संत्री, लिंबू, पपई आणि टरबूज ह्या अशा उपयोगी फळ-भाज्या आहेत ज्यांचा योग्य उपयोग आरोग्यवर्धक होऊ शकतो. सदर पुस्तकात घरात वापर होत असलेल्या फळ-भाज्या, मसाले इत्यादीच्या संदर्भात उपयोगी माहिती देण्यात आली आहे ज्यांचा उपयोग करुन वाचक आपल्या खाण्याच्या पदार्थांना अधिक स्वादिष्ट, चविष्ट तसेच आपल्या आरोग्याचे रक्षणही करु शकतो.